Mahapajapati Gotami * महापजापती गोतमी (PDF Book)
महापजापती गोतमी - Mahapajapati Gotami (PDF Book) M50
बुद्धांच्या अग्रश्रावकांच्या शृंखलेतील विपश्यना विशोधन विन्यासद्वारे प्रकाशित या पुस्तकाचा उद्देश जुन्या विपश्यी साधकांना गंभीरतापूर्वक विपश्यना ध्यानाचा अभ्यास करण्याची तसेच नवीन साधकांना या पथावर चालण्याची प्रेरणा देणे हा आहे.
महापजापती गोतमी शाक्य वंशाच्या अज्जनची कन्या तसेच राजकुमारी होत्या. त्या राजकुमार सिद्धार्थच्या मावशी होत्या. जेव्हा कुमारच्या मातेचा- महामायेचा देहांत त्याच्या जन्मानंतर सात दिवसांनीच झाला तेव्हा त्यांनीच राजकुमार सिद्धार्थ म्हणजेच भविष्यातील बुद्धांना दूध पाजून वाढविले होते.
महापजापती गोतमी प्रथम भिक्षुणी होत्या आणि भिक्षुणी-संघ स्थापन करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
या पुस्तकात त्यांचे जीवन-चरित्र, स्त्रियांना भिक्षुणी बनण्यासंबंधी बुद्धांचे उपदेश तसेच लोभाच्या दु:खातून विमुक्त होण्यात गोतमी यांची सेवा तसेच त्यांचे योगदान वर्णित आहे.
विपश्यी साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.
