Punna Mantaniputta Aani Dhammadinna * पुण्ण मन्ताणिपुत्त आणि धम्मदिन्ना ( (PDF, Marathi)
पुण्ण मन्ताणिपुत्त आणि धम्मदिन्ना
बुद्धांच्या अग्रश्रावकांच्या शृंखलेत वि.वि.वि. द्वारे प्रकाशित हे पुस्तक जुन्यासाधकांना गंभीरतेने साधना करण्यासाठी प्रेरित करते. तसेच नवीन साधकांना विपश्यनेच्या अनुकरणीय व आदर्श साधकांच्या मार्गावर चालण्यासाठी ही प्रेरित करते.
या पुस्तकात बुद्धांच्या दोन अग्रश्रावकांच्या जीवनाबाबत माहिती आहे - पुण्ण मन्ताणिपुत्त व धम्मदिना. बुद्धांनी दोघांनाही धार्मिक उपदेश देणाऱ्यांमध्ये अग्रची उपाधी दिली होती.
पुण्णमंताणिपुत्तचा जन्म एका समृद्ध ब्राह्मणकुळात झाला होता. ते बुद्धांच्या संपर्कात आले आणि त्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला. बुद्धांनी मंताणिपुत्ताची असे म्हणून प्रशंसा केली होती की यांच्यात संतुष्टी, नैतिकता, उच्चतरसमाधी, परिश्रम करण्याची क्षमता व प्रज्ञा इत्यादी दुर्लभगुण आहेत. या पुस्तकात त्यांचे जीवन चरित्र दिले आहे.
धम्मदिनाचा जन्मसुद्धा एका श्रीमंत परिवारात झाला होता. तिचा विवाह राजगिरातील विसाखशी झाला. बुद्धांच्या संपर्कात आल्यावर विसाखने विपश्यनाध्यान करणे सुरु केले. आपल्या पतीत सकारात्मक परिवर्तन पाहून धम्मदिनाही प्रेरित झाली आणि तिनेही विपश्यनेचा अभ्यास करणे सुरु केले.
या पुस्तकात तिचे जीवनचरित्र दिले आहे. त्यासोबतच निर्वाणप्राप्तीनंतर आपल्या पतीसह झालेली धर्माच्या सूक्ष्मपैलूं वर चर्चाही आहे.
हे पुस्तक साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्या साठीही उपयुक्त आहे.