Rajdharm * राजधर्म
राजधर्म
या सव्वीसशे वर्षांमध्ये बुद्धांची शिकवण पूर्णपणे लुप्त झाली. एवढेच नाही तर मानवावर उपकार करणाऱ्या या महापुरुषाविषयी बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. एक चुकीची धारणा अशी प्रचलित झाली की बुद्धांच्या शांती तसेच अहिंसेच्या उपदेशांमुळे राष्ट्र निर्वीर्य तसेच नपुंसक बनले.
विपश्यना विशोधन विन्यासाने संपूर्ण त्रिपिटकाला (ज्यामध्ये बुद्धांची मूळ वाणी सुरक्षित आहे) देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित करण्याचे साहसी पाऊल उचलले;
ज्यामुळे त्यांच्या शिकवणूकी विषयी जे काही गैरसमज आहेत ते दूर होवोत.
लोकांनी जेव्हा देवनागरी लिपीमध्ये त्रिपिटक वाचले तेव्हा हे गैरसमज दूर झाले. तसेच हे सुद्धा स्पष्ट झाले की त्यांच्या शिकवणुकीचे अनुसरण करून राज्यांचा विकास झाला, तेथे समृद्धी आली.
बुद्ध स्वतः एक राजकुमार होते, त्यामुळे राज्याच्या कर्तव्यांविषयी त्यांना पूर्ण ज्ञान होते. त्यांनी राजांना, मंत्र्यांना तसेच गणतंत्राच्या सदस्यांना सांगितले की राज्याची किंवा गणतंत्राची रक्षा कशी केली पाहिजे? काय केले पाहिजे की ज्याने त्यांची प्रगती होईल. या पुस्तकात ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे, ज्यांनी स्पष्ट होते की बुद्धांच्या उपदेशांचे पालन करून त्या काळच्या अनेक राज्यांनी विविध प्रकारे आपली उन्नती केली. हे बुद्धांच्या काळी तर झालेच परंतु शेकडो वर्षानंतरसुद्धा असे होत राहिले.
यात असेही वर्णन आहे की राजा अशोकाने कशा प्रकारे बुद्धांच्या उपदेशांतून शिकवण घेऊन आंतरिक तसेच बाह्य शत्रूंपासून रक्षा करण्यासाठी राष्ट्राला समृद्ध,
सशक्त आणि शक्तिशाली राज्य बनविले.
विपश्यी साधक तसेच जे साधक नाहीत, त्या दोघांसाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.