Aayushman Anuruddha * आयुष्मान अनुरुद्ध (Paperback, Marathi)
अनुरुद्ध
बुद्धांच्या अग्रश्रावकांच्या शृंखलेमध्ये वि.वि.वि. द्वारे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा उद्देश जुन्या साधकांना गंभीरतापूर्वक साधना करण्यासाठी तसेच विपश्यनेच्या नवीन साधकांनाही त्याच अनुकरणीय साधकांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
अनुरुद्ध बुद्धांचे चुलतभाऊ आणि त्यांच्या दहा प्रमुख शिष्यांमधून एक होते. सर्व सुख-सुविधांमध्ये वाढलेल्या, या राजकुमाराने क्षणभंगुर सुखांच्या शोधात आपला वेळ घालवणे पसंत केले आणि सुरुवातीला विपश्यना शिकण्यात काही रुची दाखवली नाही. पण नंतर, जीवनाच्या अल्पकालिक प्रकृतीला अनुभवल्यावर, त्यांनी विपश्यनेचा अभ्यास करणे सुरू केले आणि पूर्ण मुक्ती प्राप्त केली. अनुरुद्धांना दिव्य-चक्षुची क्षमता प्राप्त करण्यात अग्रणी मानले जात होते.
या पुस्तकात अनुरुद्धांची जीवन कहाणी, विपश्यना ध्यानाच्या मार्गावर त्यांची यात्रा आहे जी या कोमल आणि सुकुमार स्वभावाच्या राजकुमाराचे संपूर्णपणे मुक्त व्यक्तीमध्ये झालेले परिवर्तन तसेच बुद्ध आणि बुद्धांच्या अन्य महान शिष्यांबरोबर सूक्ष्म पैलूंवर झालेल्या त्यांच्या चर्चा यांमधून अंतर्दृष्टी प्रदान करते.
विपश्यी साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.