Annasikondanna * अञ्ञासिकोण्डञ्ञ (Paperback book)
अञ्ञासिकोण्डञ्ञ - Annasikondanna (Paperback Book)
बुद्धांच्या अग्रश्रावकांच्या शृंखलेतील विपश्यना विशोधन विन्यासद्वारे प्रकाशित या पुस्तकाचा उद्देश जुन्या विपश्यी साधकांना गंभीरतापूर्वक विपश्यना ध्यानाचा अभ्यास करण्याची तसेच नवीन साधकांना या पथावर चालण्याची प्रेरणा देणे हा आहे.
कपिलवस्तुच्या निकट एका धनी ब्राह्मण परिवारात जन्मलेले कौंडण्य तीन वेदांमध्ये खूप निष्णात होते. त्याचबरोबर ते आकृती विज्ञानाचे चांगले जाणकार होते तसेच स्वप्न-फळ सांगण्यातही ते दक्ष होते.
सिद्धार्थच्या जन्मावेळी ते त्या आठ ब्राह्मणांमधून एक होते ज्यांना राजा शुद्धोदनाने राजकुमाराचे भविष्य सांगण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या आठ जणांमधून कौंडण्यच होते ज्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की राजकुमार बुद्धच होतील. त्यांनी त्या वेळेपर्यंत प्रतीक्षा केली जोपर्यंत राजकुमाराने बोधीच्या शोधात गृहत्याग केला नाही. तेही राजकुमाराबरोबर गेले.
या पुस्तकात अन्यासिकौंडण्य यांचे जीवन-चरित्र, त्यांचे अनेक गुण तसेच सिद्धार्थ गौतमबरोबर त्यांच्या बोधी-प्राप्तीच्या शोधयात्रेत सम्मिलीत होण्याचे वर्णन आहे. त्याचबरोबर बोधी-प्राप्तीनंतर बुद्धांचा प्रथम उपदेश आणि कसे अन्यासिकौंडण्य स्रोतापन्न झाले तसेच ते का अन्यासिकौंडण्य झाले- या सर्व गोष्टींचे वर्णन आहे.
विपश्यी साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.
