मैत्री-विहारिणी माताजी श्रीमती इलायचीदेवी गोयंका - (मराठी) M53
M53-  Viharini Mataji Shrimati Illaichidevi Goenka
मैत्री-विहारिणी माताजी श्रीमती इलायचीदेवी गोयंका (मराठी)
विपश्यना विशोधन विन्यासद्वारे प्रकाशित काही निवडक विपश्यी साधकांच्या जीवन-चरित्रांच्या शृंखलेत हे पुस्तक येते. अशा प्रकारच्या पुस्तकांचा एकमात्र उद्देश आहे- आदर्श गृहस्थ साधक--साधिकांची उदाहरणे देऊन साधकांना साधनेसाठी प्रेरित करणे आणि हे सांगणे की कसे गृहस्थही विपश्यनेचा अभ्यास करून सुखी आणि शांत जीवन जगू शकतात. विपश्यनाचार्य श्री. स. ना. गोयंका यांच्या पत्नी श्रीमती इलायचीदेवी गोयंका ज्यांना सर्वजण प्रेमाने तसेच आदराने माताजी म्हणत असत, त्यांनी आपल्या जीवनात कित्येक भूमिका अतिशय कुशलतेने निभावल्या. बर्मातील एका पुराणपंथी व्यापारी परिवारात जन्मलेल्या माताजींचा विवाह श्री. सत्यनारायणजी गोयंका यांच्याशी झाला आणि त्या एका मोठ्या परिवाराच्या सदस्य बनल्या. त्यांनी समजदार पत्नी, कर्तव्य-परायण सून, स्नेहमयी माता तसेच आदरातिथ्य करणारी उत्कृष्ट गृहिणी अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्या. त्यांचे हृदय सदोदित प्रेमाने आणि करुणेने भरलेले रहायचे.
त्या एक प्रतिष्ठीत विपश्यना साधिका तसेच आचार्या होत्या. त्यांनी गोयंकाजींना विपश्यना शिकविण्यात तसेच धर्माच्या प्रचार-प्रसारणात खंबीर पहाडाप्रमाणे अटळ राहून खूप मोलाची साथ दिली. खूप मोठ्या संख्येने साधिका तसेच महिला आचार्या त्यांच्याप्रति कृपापूर्वक मार्ग दाखविण्यासाठी कृतज्ञ आहेत.
या पुस्तकात त्यांचे जीवन-चरित्र, धैर्य तसेच करुणा दाखविणाऱ्या जीवनातील घटना आणि परिवारातील सदस्यांच्या तसेच विपश्यी साधक-साधिकांच्या स्मृती वर्णित आहेत. काही जुन्या तसेच दुर्मिळ चित्रांसमवेत गोयंकाजी तसेच माताजींमधील पत्राचारही या पुस्तकात आहे.
साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.
 Preview (5.59 MB)
 Preview (5.59 MB) 
             
             
             
             
             
             
            



