Atam-Kathan Bhag : 2 * आत्म-कथन भाग : 2 (PDF - Marathi)
आत्म-कथन भाग-2
श्री स. ना. गोयंका बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. कट्टर व्यापारी हिंदू परिवारामध्ये जन्मलेले गोयंकाजी जीवनाच्या प्रारंभिक वर्षांमध्ये खूप सफल व्यावसायिक ठरले. त्याबरोबरच ते सामाजिक सुधारणा, भारताचे स्वातंत्र्य आंदोलन, राजनीती तसेच हिंदी साहित्यात खूप रुची घेत असत. वयाच्या एकतिसाव्या वर्षी ते विपश्यनेकडे आकर्षित झाले आणि विपश्यनेचे एक गंभीर साधक झाले. ते खूप जणांसाठी आशेचा एक प्रकाश स्तंभ आहेत आणि एका व्यावसायिकातून विपश्यनेच्या प्रमुख आचार्यांमध्ये झालेले त्यांचे रूपांतरण मोठे आश्चर्यकारक आहे. विपश्यना विशोधन विन्यासाने त्यांचे आत्मकथन दोन भागात याच उद्देशाने प्रकाशित केले आहे की लोक त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ शकतील की कसे एक आदर्श गृहस्थ विपश्यनेचा अभ्यास करून सुखी आणि शांत जीवन व्यतीत करू शकतो.
या दुसऱ्या भागात गोयंकाजींनी अशा व्यक्तींचे जीवन-चरित्र लिहिले आहे ज्यांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. यात आपले आचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचे सविस्तर वर्णन केले आहे, आपल्या पहिल्या विपश्यना शिबिरात आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे तसेच याचेही वर्णन केले आहे की कसे या अनुभवांमुळे त्यांचे जीवन नेहमीकरता पूर्णपणे बदलून गेले. सुरुवातीच्या काळात भारतात आल्यावर विपश्यना शिबिरांमध्ये आलेल्या कडू-गोड अनुभवांचे वर्णनही येथे केले आहे तसेच भारताबाहेरील प्रथम शिबिरांच्या अनुभवांचे वर्णन सुद्धा आहे आणि विपश्यनेच्या प्रचारातील मोठ-मोठ्या टप्प्यांचा उल्लेख देखील आहे. धर्मप्रकाशाच्या वाहकाच्या रूपातील त्यांच्या यात्रेबरोबर बुद्ध शिकवणुकी बरोबर जोडलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा अर्थ सुद्धा येथे दिला आहे ज्यामुळे त्याविषयी असलेल्या गैरसमजुती दूर होऊ शकतील.
विपश्यी साधक तसेच जे साधक नाहीत त्या दोघांसाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.






