सारिपुत्त * भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त - (Marathi PDF Book)
सारिपुत्त * भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त - Marathi PDF Book
विपश्यना विन्यास द्वारा ‘बुद्धांच्या अग्रश्रावकांची शृंखला’ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा उद्देश जुन्या साधकांना गंभीरतापूर्वक साधना चालू ठेवण्यासाठी तसेच नवीन साधकांना या पथावर चालण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. जेणेकरून तेही विपश्यना ध्यानाचा त्याच गंभीर प्रकारे अभ्यास करणारे होतील.
सारिपुत्त यांचा जन्म राजगृहाच्या जवळ एका धनवान ब्राह्मण परिवारामध्ये झाला होता. त्यांचे पालन पोषण सर्व प्रकारच्या सुख-सोयींमध्ये झाले. परंतु विलासाच्या साधनांची तसेच ऐन्द्रिय सुखांची क्षणभंगुरता पाहून त्यांना निर्वेद जागला. आणि ते, तसेच त्यांचे बालमित्र मोग्गल्लान मुक्ती-मोक्षाच्या शोधात आध्यात्मिक यात्रेला निघाले.
या पुस्तकात या महान विपश्यी साधकांच्या मुक्तीच्या शोधाच्या यात्रेचे वर्णन आहे. सारिपुत्त महाप्रज्ञावानांमध्ये अग्र होते आणि विपश्यनेच्या प्रचार-प्रसारामध्ये त्यांचे योगदान असाधारण होते. भगवान बुद्धांद्वारे त्यांना दिले गेलेले मार्गदर्शन, तसेच त्यांचे, भगवान बुद्ध आणि मोठ-मोठ्या शिष्यांबरोबर विपश्यना ध्यानाच्या सूक्ष्म पैलूंवर झालेल्या वार्तालापाचे वर्णनही या पुस्तकात आहे.
विपश्यी साधक तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.