Kay Buddha Nastik Hote? काय बुद्ध नास्तिक होते? (PDF Marathi)
M46-pf- Kay Buddha Nastik Hote? काय बुद्ध नास्तिक होते? (PDF Book- Marathi)
विपश्यना विशोधन विन्यास (Vipassana Research Institute) मधून प्रकाशित बुद्धांच्या मौलिक शिकवणुकीला पुनर्जीवित करण्याच्या शृंखलेमध्ये हे पुस्तक एक कड़ी आहे तसेच याचा उद्देश बुद्ध आणि त्यांच्या शिकवणुकीविषयी असलेल्या भ्रांतींना दूर करणे हा आहे. याचबरोबर याचा उद्देश बुद्धांच्या मूळ शिकवणीचा भारताला तसेच भारताबाहेर संपूर्ण विश्वाला परिचय करून देणे हा आहे.
२६०० वर्षांपूर्वी बुद्धांची मूळ शिकवण भारतातून पूर्णपणे विलुप्त झाली. या महामानवाविषयी तसेच त्यांच्या शिकवणीविषयी अनेक भ्रांती पसरल्या.
बुद्धांच्या या विश्वजनिक, असांप्रदायिक तसेच बुद्धीसंगत शिकवणीला लोक तेव्हा जाणू लागले जेव्हा विपश्यना विशोधन विन्यासने (Vipassana Research Institute) प्रामाणिक ग्रंथावर आधारित संपूर्ण त्रिपिटक (पालिवाङ्मय) देवनागरी तसेच अन्य लिपींमधून प्रकाशित केले.
बुद्धांना लोक नेहमी नास्तिक म्हणतात. या पुस्तकात नास्तिक शब्दाचा अर्थ दिला गेला आहे आणि बुद्ध तसेच बुद्धपूर्वकाळात याचा काय अर्थ होता हे देखील दर्शविले आहे. या गोष्टीचाही इथे उल्लेख आहे की बुद्धांना जीवनभर अनेक प्रकारच्या टीका ऐकून घ्याव्या लागल्या, विशेष करून नास्तिकच्या रूपात. त्या काळचे दार्शनिक विचार काय होते आणि तशा विचारकांमध्ये जे वार्तालाप होत होते त्याचाही उल्लेख इथे आहे.
विपश्यी साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.
