KOSALRAJ PASENADI * कोसलराज पसेनदि ( PDF Book)
कोशलराज पसेनदि - Kosalraj Pasenadi, Marathi PDF Book
बुद्धांच्या अग्रश्रावकांच्या शृंखलेत विपश्यना विशोधन विन्यासद्वारे प्रकाशित या पुस्तकाचा उद्देश जुन्या विपश्यी साधकांना गंभीरतापूर्वक विपश्यना ध्यानाचा अभ्यास करण्याची तसेच नवीन साधकांना या पथावर चालण्याची प्रेरणा देणे हा आहे.
२५०० वर्षांपूर्वी मगध आणि कोसल ही दोन्ही भारताची खूपच शक्तिशाली राज्ये होती. दोन्ही राज्यांचे राजे बुद्धांच्या संपर्कात आले आणि त्यांनी अनेक प्रकारे धर्माचा प्रचार-प्रसार केला. कोसलचा राजा प्रसेनजितला प्रारंभी बुद्ध आणि धर्मावर तितकी श्रद्धा नव्हती. बुद्धांना मानणाऱ्या राणी मल्लिका तसेच इतर संबंधितांच्या घेऱ्यात राहूनही प्रसेनजित बुद्धांची शिकवण स्विकारायला कचरत राहिला.
या पुस्तकात या शक्तिशाली राजाच्या तसेच त्याच्या प्रधान महिर्षी राणी मल्लिकाच्या धर्मयात्रेचे वर्णन आहे. बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीविषयीच्या राजाच्या शंका, मानवी प्रकृतीच्या विभिन्न पक्षांवर बुद्धांबरोबरच्या त्यांच्या पारस्परिक प्रतिक्रिया, आपल्यावर प्रेम करण्याचे तसेच रक्षण करण्याचे सर्वोत्तम उपाय, विभिन्न प्रकारचे लोक, दान देण्याची उत्तम पद्धत आणि धर्माच्या विविध पक्षांचेही यात वर्णन आहे.
या पुस्तकात तसेच मगधराज सेनिय बिंबिसारमध्ये सांसारिक जीवन जगणाऱ्या राजावर तसेच प्रजेवर बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव दाखवला गेला आहे.
विपश्यी साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.
