परम तपस्वी श्री रामसिंहजी * Param Tapsvi Shrii Ramsinghji M54-pf (मराठी PDF BOOK)
परम तपस्वी श्री रामसिंहजी (मराठी PDF BOOK) M54-pf
Param Tapsvi Shrii Ramsinghji
विपश्यना विशोधन विन्यासाद्वारे वरिष्ठ विपश्यना साधकांच्या जीवनाविषयीच्या शृंखलेची ही एक नवीन कडी आहे. या शृंखलेचा प्राथमिक उद्देश आहे की लोकांना एका आदर्श जीवन-चर्ये विषयी माहिती देणे की कसा एक गृहस्थ विपश्यना ध्यानाचा अभ्यास करून सुखी आणि शांत जीवन व्यतीत करू शकतो.
एक वरिष्ठ आय.ए.एस अधिकारी रामसिंहजी 1975 मध्ये आपल्या पहिल्या दहा दिवसाच्या शिबिरात सहभागी झाले. त्यावेळी ते राजस्थान सरकारचे गृहसचिव होते. आपल्या पहिल्या शिबिरानंतर ते या वैज्ञानिक, असांप्रदायिक तसेच सद्य फळ देणाऱ्या विधी विषयी खूप प्रभावित झाले. त्यांनी तुरुंगांमध्ये सुधार होण्यासाठी या विधीचा उपयोग केला. 1975 मध्ये जयपुर कारागृहात व त्यानंतर भारताच्या इतर कारागृहांमध्ये विपश्यनेचा प्रयोग करण्यामागे ते प्रेरक ठरले.
1980 नंतर त्यांनी आपला पूर्णवेळ विपश्यना ध्यान साधनेसाठी समर्पित केला. 1982 मध्ये ते सहाय्यक आचार्य नियुक्त झाले. ते आपले उत्कृष्ट नेतृत्व, निर्दोष चारित्र्य आणि उदार व्यक्तिमत्व यासाठी प्रख्यात झाले. हे पुस्तक त्यांचे जीवन चरित्र आणि उदार स्वभावाचे वर्णन करते. त्याबरोबरच आपले सोबती विपश्यी साधक, आपल्या परिवारातील सदस्य, मृत्यूसंबंधी त्यांचे विचार आणि मृत्यूनंतर काय केले पाहिजे याविषयीचे त्यांचे निर्देश इत्यादींचा उल्लेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकात रामसिंहजी यांनी विपश्यना पत्रिकेत लिहिलेल्या लेखांचे संकलन सुद्धा आहे. विपश्यी साधक तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हे एक आदर्श पुस्तक आहे.

