Magadhnaresh Vaidehiputra Ajatshatru * मगधनरेश वैदेहीपुत्र अजातशत्रु (Paperback book)
Code No - M48
Magadhnaresh Vaidehiputra Ajatshatru (Vedehiputta Ajatsattu)
मगधनरेश वैदेहीपुत्र अजातशत्रु (वेदेहिपुत्त अजातसत्तु)
बुद्धांच्या अग्रश्रावक म्हणजे प्रमुख शिष्यांच्या मालिकेतील विपश्यना संशोधन संस्थेकडून प्रकाशित या पुस्तकाचा हेतू आहे, की जुन्या विपश्यी साधकांना विपश्यना ध्यानसाधनेचा गंभीरतेने अभ्यास करण्यासाठी, तसेच नवीन साधकांना ह्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरणा देणे.
राजा बिम्बिसार आणि त्यांची पत्नी कोसलदेवी, हे दोघे विपश्यी साधक होते. अजातशत्रू हा त्यांचा पुत्र होता. परंतु विपश्यनेचा काहीच प्रभाव त्याच्यावर पडला नव्हता. त्याचे जीवन विरोधाभासाने भरलेले होते. चुकीचा प्रभाव आणि लोभामुळे त्याने आपल्या वडिलांची हत्या करवली. वडिलांची गादी हडप करून, पूर्व भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, त्याने आसपासची राज्य जिंकली. जेव्हा त्याच्या लक्षात आले, की त्याचा मार्ग चुकीचा आहे, तेव्हा त्याचे मन दु:खाने, पश्चात्तापाने आणि मानसिक अशांतीने भरून गेले आणि शेवटी तो बुद्धांकडे गेला.
ह्या पुस्तकात, अजातशत्रूचे जीवन चरित्र वर्णन केले गेले आहे. तसेच त्याच्या त्या जीवन यात्रेचेही वर्णन आहे. ज्यात तो चंडाशोकहून धर्माशोक बनला. आणि त्याने एका स्तूपाची निर्मिती केली, ज्यात बुद्धांच्या अस्थी-अवशेष सुरक्षित ठेवले गेले. त्यांनी बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिन्यानंतर राजगिरीत आपल्या संरक्षणा खाली, पहिल्या ऐतिहासिक धम्मसंगीतीचे आयोजन केले. ह्या पुस्तकात प्राचीन भारतातील गणराज्याचे स्वरूप कसे होते? त्याचे रक्षण कसे केले जायचे? आणि त्याची प्रगती कशी होऊ शकेल? ह्या बाबतचे बुद्धांचे विचारही वर्णन केले आहेत.
विपश्यी साधकांना, तसेच जे कोणी साधक नाहीत, त्यांच्यासाठी हे एक आदर्श पुस्तक आहे.