Ahuneyya, Pahuneyya, Anjalikarniya Dr. Omprakashji * आहुनेय्य, पाहुनेय्य, अंजलिकरणीय डॉ. ओमप्रकाशजी (Paperback Book)
Code no: M49
आहुनेय्य, पाहुनेय्य, अंजलिकरणीय डॉ. ओमप्रकाशजी.
हे पुस्तक काही निवडक वरिष्ठ विपश्यी साधकांच्या विपश्यना विशोधन विन्यासमधून प्रकाशित झालेल्या जीवन चरित्रांच्या शृंखलेत येते. या शृंखलेचा प्रमुख उद्देश लोकांना आदर्श उदाहरणांच्या रूपात त्या गृहस्थांच्या जीवन चरित्राला दर्शवणे हा आहे ज्यांनी विपश्यनेचा अभ्यास करून सुख आणि शांतीचे जीवन व्यतीत केले.
डॉ. ओमप्रकाश स. ना. गोयंकांचे पारिवारिक डॉक्टर तसेच मित्र होते. त्यांनी गोयंकाजींच्या विपश्यी मातेने की ज्यांना खूप पीडा होत असतानाही शांतपणे आपले शरीर सोडले, हे पाहिले तेव्हा प्रेरित होऊन विपश्यना शिबिरात भाग घेतला. पहिल्या शिबिरातच डॉक्टर ओमप्रकाश स्रोतापन्न झाले. 1988 मध्ये त्यांना सहाय्यक आचार्य म्हणून नियुक्त केले गेले.
या पुस्तकात त्यांचे जीवन चरित्र आहे, विपश्यनेच्या प्रचार प्रसारतील त्यांच्या अपूर्व योगदानाचे वर्णन आहे तसेच अशा घटनांचे वर्णन आहे की ज्यातून हे माहित होते की ते किती साधेपणाने जीवन व्यतीत करत होते. त्याचबरोबर त्यांच्या विनोदी आणि नम्र स्वभावाचेही वर्णन आहे, इतरांप्रति त्यांना वाटणारी काळजी तसेच दुःखाच्या वेळी त्यांचा शांत राहण्याचा स्वभाव याचेही वर्णन यात आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलेले विपश्यना पत्रिकेतील अनेक लेखही आहेत.
विपश्यी साधकांना तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.